• Medientyp: E-Book
  • Titel: डॉ. आंबेडकरांचा राज्य समाजवाद आणि शेतीविषयक आर्थिक धोरण (Dr. Ambedkar's State Socialism and Agricultural Economic Policy)
  • Beteiligte: Bagde, Dr. Rakshit [Verfasser:in]
  • Erschienen: [S.l.]: SSRN, [2021]
  • Umfang: 1 Online-Ressource (8 p)
  • Sprache: Marathi
  • Entstehung:
  • Anmerkungen: In: Proceedings of UGC Sponsored One day National Conference, 2015
    Nach Informationen von SSRN wurde die ursprüngliche Fassung des Dokuments Jul 2015 erstellt
  • Beschreibung: Marathi Abstract: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे थोर अर्थतज्ज्ञ होते. ते भारतमातेचे एक महान सुपुत्र होते. भारतीय राज्यघटनेचे शील्पकार म्हणून ते सर्वज्ञात आहेत. कायदेशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र ते मानववंशशास्त्र आणि तुलनात्मक धर्मशास्त्र अशा भिन्न-भिन्न ज्ञान शाखामध्ये भराऱ्या घेऊन त्यांनी त्यामध्ये मोलाची भर घतली आणि त्याला विद्वन्मान्यताही मिळाली. ‘एक महान समाजसुधारक, मानवी हक्कांचे कैवारी, पददलितांचे उद्धारकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सांसद आणि पत्रकार म्हणूनही त्यांना जगन्मान्यता मिळाली.’ त्यांच्या बहुविध व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण अंग मात्र दुर्दैवाने दुर्लक्षित राहिले - ते म्हणजे त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून बजावलेली विलक्षण कामगिरी. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असूनही बहुसंख्य जनतेचे सुरक्षित उपजीविकेचे साधन होऊ शकला नाही. भारतीय लोकसंख्येच्या एकतृतीयांष लोकसंख्या पोसण्याची क्षमता भारतीय शेतीत असूनही शेतीची प्रगती होऊ शकली नाही. डॉ. आंबेडकरप्रणित आर्थिक विचारात भूसुधारणा, भूमीचे अपखंडन आणि विभाजन हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. भारतीय शेतीच्या बाबतीत निर्माण समस्यांच्या निराकरणार्थ डाॅ. आंबेडकरांनी भूमीचे एकत्रीकरण, सामूहिक शेती इ. सारखे उपाय सांगितले आहेत. डॉ. आंबेडकरांनी शेतीशी निगडित असलेले प्रष्न सोडविण्यासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे यावर भर दिला होता. ‘शेतीचे राष्ट्रीयीकरणातून आर्थिक गुलामगिरी नष्ट होऊन आर्थिक दृष्ट्या कल्याणकारी राज्य निर्मितीस मदत होईल. सामुदायिक शेतीचा प्रयोग प्रत्यक्षात आणला तर शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. श्रमिक आणि शेतमजूर यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होऊन त्यांचा आर्थिक विकास होईल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिक सुदृढता प्राप्त होईल.’ वरील सर्व विचार महत्त्वाचे असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश पाडणारे आहेत. शेतीचे औद्योगिकीकरण केल्याशीवाय भूमीहीन मजुरांचा प्रष्न मूलतः सुटणार नाही असे, डॉ. आंबेडकरांचे मत होते. शेतीपासून उद्योग धंद्यांची फारकत होणे हे अर्थव्यवस्थेला धोकादायक असते. शेती बरोबर शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविले तरच शेतकऱ्यांचा प्रष्न सुटेल. औद्योगिकरण विशेषतः ग्रामीण भागातील औद्योगिकरण त्याच प्रमाणे सुधारित शेती यांचा उपयोग देशातील कामगारांना काम देण्यात होईल असे डॉ.आंबेडकरांना नेहमी वाटत होते. डॉ.. आंबेडकरांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोणातून शेतीच्या विविध प्रष्नांची चिकित्सा केलेली आहे. केवळ चिकित्साच नव्हे तर ते प्रष्न सोडविण्यासाठी उपाययोजना केलेली आहे

    English Abstract: Dr. Babasaheb Ambedkar was a great economist of modern India. He was a great son of Mother India. He is well known as the architect of the Indian Constitution. He excelled in various disciplines, from jurisprudence, sociology, political science to anthropology and comparative theology, and gained scholarly recognition. ‘He was also recognized as a great social reformer, human rights activist, savior of the downtrodden, academician, MP, and journalist.’Although agriculture is the backbone of the Indian economy, it has not been able to provide a secure livelihood for the majority of the population. Despite the ability of Indian agriculture to feed one-third of the Indian population, agriculture has not progressed. Dr. Land reform, land fragmentation, and partition are important issues in Ambedkar's economic thinking. In order to solve the problems of creation in the case of Indian agriculture, Dr. Ambedkar introduced land consolidation, collective farming, etc. Similar measures are stated.Dr. Ambedkar had emphasized the nationalization of agriculture to solve the problems related to agriculture. ‘Nationalization of agriculture will eliminate economic slavery and help create an economically prosperous state. Practicing community farming will help increase productivity in agriculture. It will help in increasing the efficiency of the workers and agricultural laborers and their economic development. By raising the living standards of the farmers, they will get economic prosperity. 'All the above thoughts are important and shed light on the country's economy.Without the industrialization of agriculture, the problem of landless laborers will not be solved, said Dr. Ambedkar had an opinion. The separation of industries from agriculture is dangerous for the economy. The problem of farmers will be solved only if the agro-processing industries are expanded along with agriculture. "Industrialization, especially in rural areas, as well as improved agriculture will be used to provide employment to the workers of the country," he said. Ambedkar always thought so. Dr. Ambedkar has treated various questions of agriculture from an economic point of view. Not only sound education but his alertness and dedication too are most required
  • Zugangsstatus: Freier Zugang